Join us

सोनम कपूूरने केले ग्लॅमरस फोटोशूट, युजर्सनी म्हटले ‘कार्टून’! पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST

सोनम कपूर बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. सोनमने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनमने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. परंतु तिच्या या अदा युजर्सला फारशा आवडल्या नसाव्यात असेच दिसत आहे. कारण बºयाचशा इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या फोटोला ‘कार्टून’ असे कॉमेण्ट दिले.

सोनम कपूर बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. सोनमने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनमने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. परंतु तिच्या या अदा युजर्सला फारशा आवडल्या नसाव्यात असेच दिसत आहे. कारण बºयाचशा इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या फोटोला ‘कार्टून’ असे कॉमेण्ट दिले. मॅगझीनच्या कव्हर पेजवर सोनम लाल रंगाच्या फ्रॉकवर रंगीत श्रग परिधान करून दिसत आहे. या कव्हर पेजला ‘द हॅप्पीनेस प्रोजेक्ट’ असे टायटल दिले आहे.हे फोटोशूट मॅगझीनच्या जानेवारी महिन्यासाठी केले आहे. सर्व फोटोंमध्ये सोनम खूपच ग्रेसफुल दिसत आहे.या वर्षाचे सोनमचे हे पहिलेच फोटोशूट आहे. ती नेहमीच प्रसिद्ध मॅगझीनसाठी फोटोशूट करीत असते.सोनमच्या या फोटोंवर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेण्ट करीत आहेत. काही इन्स्टा युजर्सनी तिला कार्टून असे म्हटले आहे. तर काहींनी तिच्या कपड्यांवर निशाणा साधला आहे.सोनम सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तिला इन्स्टाग्रामवर ११ मिलियनपेक्षा अधिक युजर्स फॉलो करतात.सोनम लवकरच अभिनेता अक्षयकुमार याच्यासोबत ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.त्याचबरोबर ती बहीण रिया कपूर हिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातही बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया झळकणार आहेत.