Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरनंतर सनी लिओनीचेही इमोजी स्टिकर्स लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 17:36 IST

बघताच ती बाला कलेजा खलास झाला असे जिच्याविषयी म्हटले जाते ती म्हणजे सनी लिओनी.सनी लिओनीशी निगडीत प्रत्येक गोष्ट चाहते ...

बघताच ती बाला कलेजा खलास झाला असे जिच्याविषयी म्हटले जाते ती म्हणजे सनी लिओनी.सनी लिओनीशी निगडीत प्रत्येक गोष्ट चाहते पसंत करतात.गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात सनी लिओनीने तिचे एक मोबाईल अप्लिकेशनही लाँच केले होते.या अप्लिकेशनमध्ये तिची सगळी माहिती देण्यात आली आहे.मोबाईल अॅप्लिकेशननंतर पुन्हा एकदा वेगळेकाही करण्याचा प्लॅनिंग करत असल्याचे त्याचेवळी सनीने म्हटले होते. बरोबर दोन महिन्यानंतर सनी पुन्हा रसिकांच्या भेटीला आली आहे.आता स्मार्टफोन युजर्सना सनी लिओनीचे वेगवेगळ्या मुडमधले इमोजी स्टिकर उपलब्ध झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनम कपूरनेही तिचे एमोजी स्टिकर लाँच केले होते.सोनम कपूरप्रमाणेच सनी लिओनीचे इमोजी आज लाँच करण्यात आले आहेत. खुद्द सनी लिओनीचे इमोजी लाँच झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.या इमोजींमध्ये सनीने रूपेरी पडद्यावर साकारलेले वेगवेगळे कॅरेक्टर रेखाटण्यात आले आहेत. नुकतेच लैला मै लैला या गाण्यावर थिरकणारी सनीचा हॉट अंदाज रसिकांनी 'रईस' सिनेमात पाहिला.सनीची ही 'लैलाही' या इमोजी स्टिकर्समध्ये रेखाटण्यात आली आहे.सोशल मीडियावर अनेकांना हे इमोजी खूप भन्नाट आहेत. अशा वेगवेगळ्या कमेंट करत सनीचे कौतुकही केले आहे. सनी लिओनीचे इमोजी स्टिकर्स खूप हाय डिफेनेशन क्वॉलिटीचे बनवण्यात आलेले आहे.खास इंडोनेशन कंपनीने सनीची पॉप्युलारिटी बघता खास पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. सोनम कपूरपेक्षा सनीचे इमोजी खूप अट्रॅक्टीव्ह आहेत. फक्त सोनम कूपर अॅप्लिकेशन युझर्सनाच सोनमचे इमोजी स्टिकर्स वापता येतात.मात्र सनीचे इमोजी स्टिकर्स हे जे अप्लिकेशन वापरत नाहीत असे स्मार्टफोन युझर्सनाही डाऊलोड करता येणार आहेत.सोनमचे इमोजी स्टिकर्स फिल्म बेस्ड नव्हते,तर सनीचे इमोजी स्टिकर्स हे फिल्म बेस्ड आहेत. त्यामुळे ते अधिक लोकप्रिय होणार याची खात्री देण्यात आली आहे. सनी ही फक्त डिजीटल मार्केटमध्ये सगळ्यात पॉप्युलर सेलिब्रेटी असल्यामुळे इमोजीमुळेही खुप फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.जगभरात 7 बिलीयन इमोजी यंगस्टर्स डाऊनलोड करत असतात.सध्या हे इमोजी स्टिकर्सचे अॅप फ्री डाऊनलोड करता येणार आहेत.काही दिवसानंतर हे इमोजी वापरण्यासाठी पैसे देवून विकत घ्यावे लागणार आहे.किम कर्दाशिअनचेही इमोजी खूप लोकप्रिय झाले होते.त्यातून 100 मिलीयन डॉलरची कमाई झाली होती.त्यामुळे सनीचे हे इमोज स्टिकर्सही खूप कमाई करणार असल्याचे बोलले जात आहे.