Join us

सोनम कपूरने पती आनंद आहुजासाठी लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचे केले खास प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 13:41 IST

कामाच्या निमित्ताने दोघांनाही एकमेकांना वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे अशाचप्रकारे निमित्त साधत सोनम आनंदसह क्वॅालिटी टाईम स्पेंड करणार आहे. 

सोनम कपूर आणि आनंद आहुजा गेल्या वर्षी 8 मे 2018ला लग्नबंधनात अडकले होते. आता लग्नाची अॅनिव्हर्सरीचे खास प्लॅनिंग सोनमने केले आहे.त्यासाठी पती आनंद आहुजाने लंडनहून लवकरच भारतता परतावा अशी सोनमची इच्छा आहे. आनंद आहुजा सोनम नेमकं काय गिफ्ट करणार हे तर अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी समजणार आहे. विशेष म्हणजे गिफ्टच्या बाबतीत मला जे हवे असते ते मागते आणि ते मला मिळतेही. त्यामुळे पहिल्या  अॅनिव्हर्सरीला काही तरी खास करण्याचे प्लॅनिंग नक्कीच आहे असे सोनमने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच सोनम जोया फैक्टर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिषेक शर्मा सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. येत्या 14 जूनला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे शूटिंग संपून ती व्हॅकेशनवर जाणार असल्याचे समजतंय. अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशन नंतर सोनम पुन्हा तिच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. कामाच्या निमित्ताने दोघांनाही एकमेकांना वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे अशाचप्रकारे निमित्त साधत सोनम आनंदसह क्वॅालिटी टाईम स्पेंड करणार आहे. 

विशेष म्हणजे सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असते. आपला लाडका अभिनेता किंवा अभिनेत्री लग्नात काय परिधान करतात याकडं रसिकांच्या नजरा असतात. अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात तिच्या लेंहग्याची आणि तिने परिधान केलेल्या ९० लाख रुपये किंमतीच्या अंगठीची रसिकांमध्ये चर्चा रंगली. आनंदने सोनमला लग्नावेळी हे खास सरप्राईज गिफ्ट दिले होते. इतकी महागडी अंगठी आनंदने सोनमला गिफ्ट केली होती. त्यामुळे आनंदचे हे सरप्राईज गिफ्ट खास ठरले होते. 

टॅग्स :सोनम कपूर