हातावरची मेहंदी निघाली नसतानाही सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत कान्सला निघाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 11:42 IST
ती...फॅशनिस्टा... दरवर्षी कान्स फेस्टिव्हलला तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावते. यावर्षीही ती अगदी न चुकता या कान्स फेस्टिव्हलला ...
हातावरची मेहंदी निघाली नसतानाही सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत कान्सला निघाली...
ती...फॅशनिस्टा... दरवर्षी कान्स फेस्टिव्हलला तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावते. यावर्षीही ती अगदी न चुकता या कान्स फेस्टिव्हलला निघाली आहे. आता तुम्ही म्हणाल कोण आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री? नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर होय. ती अलीकडेच बिझनेसमॅन आनंद अहुजा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. तिने नुकताच तिचा फ्लाइटमध्ये बसलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे नवविवाहित जोडपे फ्रेंच राइव्हरीयाला कान्स फेस्टिव्हलसाठी जात आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या हातावरची लग्नाची मेहंदी देखील अजून निघालेली नाहीये, हे दिसते आहे. आनंद सोबत ती या फेस्टिव्हलला जात आहे म्हणून याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून अक्षरश: ओसंडून वाहत आहे.सोनम कपूर ही कान्स फेस्टिव्हलसाठी दरवर्षी तिच्या फॅशन स्टेटमेंट्सने सर्व जगाला भूरळ घालत असते. यंदा मात्र तिच्यासोबत तिचा पती आनंद अहुजा देखील असणार आहे. तो तिच्यासोबत रेड कार्पेटवरून रॅम्पवॉक करणार आहे याचा तिला सर्वांत जास्त आनंद वाटतो आहे. तिच्यासोबतच तिचे फॅन्स देखील या बॉलिवूडच्या कपलला रॅम्पवॉक करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एवढंच नाही तर आता ती कान्सहून परतल्यावर पुन्हा तिच्या कामाला जोमाने सुरूवात करणार आहे. हे आम्ही नाही तर स्वत: तिनेच सांगितले आहे. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे प्रमोशन ती करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत करिना कपूर खान, स्वरा भास्कर, शिखा तल्सानिया या दिसणार असून १ जून रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचे मुंबई येथे अतिशय शाही पद्धतीने लग्न पार पडले. दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करीत होते. रीतिरिवाजानुसार दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. सोनमची मावशी कविता सिंग यांच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक बडे कलाकार यावेळी उपस्थित होते.