Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोनम कपूर या कारणामुळे बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 13:18 IST

बॉलिवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. बिजनेसमन आनंद अहुजाशी थाटामाटात होणाऱ्या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. ...

बॉलिवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. बिजनेसमन आनंद अहुजाशी थाटामाटात होणाऱ्या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला. या सगळ्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलेली सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर नंबर वन स्थानी असलेल्या ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राला या आठवड्यात सोनम कपूरने मागे टाकले आहे.  बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या स्कोर ट्रेंड्सच्या लिस्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन या आठवड्यात ७०.६८ अंकांनी प्रथम स्थानी आहेत तर दुसऱ्या स्थानावर सलमान खान आणि तिसऱ्या क्रमांकावर संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रणबीर कपूर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषावर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल याविषयी सांगतात, “सोनम कपूरच्या ‘वीरे दे वेडिंग’ फिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक, ट्विटर, व्हायरल न्यूज, प्रिंट प्रकाशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोनम कपूरच्या लग्नाविषयी बऱ्याच बातम्या आल्या. या सगळ्यामुळेच सोनम कपूर ८०.९२ अंकांनी बॉलिवूडमधली सर्वाधिक चर्चिली गेलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री ठरलीय.” आकडेवारीनुसार, ६१.३२ अंकांनी प्रियंका चोप्रा दुसऱ्या स्थानी तर ५९.४३ अंकांनी दीपिका पादूकोण तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अश्वनी कौल सांगतात, "फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश ही आकडेवारी काढताना होतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो. आम्ही १४ भारतीय भाषांमधल्या ६०० बातम्यांच्या स्रोताद्वारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो."सोनम कपूरच्या लग्नाविषयी, मेहेंदी सेरमनीविषयी विविध बातम्या सध्या देखील सोशल मीडियावर, मीडियामध्ये वाचायला मिळत आहेत. त्यामुळे या आठवड्यात देखील सोनमच नंबर वनवर असणार का याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली आहे. Also Read : ​सोनम कपूरच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?