सोनम कपूर झाली नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 11:15 IST
काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने 60व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबासोबत त्यांने बर्थ डे सेलिब्रेशन लंडनमध्ये केले. या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये ...
सोनम कपूर झाली नाराज
काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने 60व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबासोबत त्यांने बर्थ डे सेलिब्रेशन लंडनमध्ये केले. या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर मीडियामध्ये सोनम आणि आनंदच्या रिलेशनशिपला घेऊन अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावर सोनम आला चांगलीच वैतागली आहे. तिची आनंद अहुजा बरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांबाबत तिने तिच्या पीआर टीमला चांगलेच खडसावल्याचे समजते आहे. मीडियाबाबत होणाऱ्या लिंक अपच्या चर्चाचा पूर्णपणे बंद करण्यास तिने बजावले आहे. गेल्या काही दिवसापांसून सोनम आणि आनंदच्या रिलेशनशिपच्या चर्चेला सगळीकडेच उधाण आले आहे. सगळीकडे याबाबत सोनमला प्रश्न विचारला जाते. तिची उत्तर तिखट मिर्ची लावून प्रसिद्ध केली जातात असे सोनमचे म्हणणे आहे. सोनमाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर सोनम ही समाधानकारक उत्तर देते नाही. सोनमला तिच वैयक्तिक आयुष्य मीडियापासून लांब ठेवायला आवडत असल्याचे तिचे म्हणणे आहे. टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सहभागी होताना आपली पर्सनल लाइफ पडद्याच्या मागे ठेवायला सोनमला आवडते. मात्र एवढे सगळ करताना सोनम स्वत:चा सोशलमीडियावर आनंद आहुजासोबतचे फोटो सातत्याने शेअर करत असते. सोनम नेहमीच तिच्या फॅशन स्टाइला घेऊन चर्चेत असते. प्रत्येक पार्टी किंवा अॅवॉर्ड सोहळ्यात सोनम काही तरी हटके अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधते.