Join us

​ सोनम कपूर बरसली; मी बिकीनी घातली किंवा बुर्खा, तुमचं काय जातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 12:49 IST

सोनम कपूर म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिके्र’ अभिनेत्री. तिच्या वागण्या-बोलण्यातून कायम तिचा हा ‘बेफिक्रे’ अंदाज झळकतो. सध्या याच अंदाजामुळे सोनम चर्चेत ...

सोनम कपूर म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिके्र’ अभिनेत्री. तिच्या वागण्या-बोलण्यातून कायम तिचा हा ‘बेफिक्रे’ अंदाज झळकतो. सध्या याच अंदाजामुळे सोनम चर्चेत आली आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये सोनम अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या या बोल्ड ड्रेसवर अनेक बºया वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या सगळ्यांवर सोनमने अतिशय परखड प्रतिक्रिया नोंदवली आहे. होय, मी बिकीनी घातली किंवा बुर्खा, तुमचं काय जातं? असा टीकाकारांची तोंड बंद करणारा सवाल तिने विचारला आहे.}}}}माझा सेन्सॉरशिपवर भरवसा नाही. सर्वांना सर्व प्रकारचे कपडे वापरण्याचा, आपले सौदर्यं हव्या त्या पद्धतीने व्यक्त करण्याचा आणि आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझे म्हणाल तर मला सेन्सॉरशिप अजिबात मान्य नाही, असे सांगत भारतीय समाजात महिलांच्या फॅशनवर असलेल्या बंधनांवर सोनमने जोरदार हल्ला चढवला आहे. ती म्हणते, प्रत्येक मुलीला स्वत:चा निर्णय घेता यायला हवा. आपण बिकीनी वापरायची की, बुर्खा हे तिला स्वत:ला ठरवता यायला हवे. धर्म, कपडे, शिक्षण आणि लग्न यांबाबतही हाच मुद्दा लागू होतो. आपण लोकांवर जितकी बंधणं घालता लोक तितकेच आक्रमक होतात.  आपला देश आणि या देशातील नागरिक जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा घटक आहोत. म्हणूनच लोकांना स्वतंत्रपणे जगण्याच हक्क असायला पाहिजे.केवळ बोल्ड ड्रेसिंग सेन्सवरच नाही तर सोनमच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºयांनाही तिने फैलावर घेतले. तू तुझ्या चित्रपटात गाशील का? असा सवाल तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने टीकाकारांना चांगलेच फटकारले. मला गाणे येत नाही. आधीच मला अ‍ॅक्टिंग येत नाही, असे लोक म्हणतात. गायला लागले तर हिला गाताही येत नाही, असे टीकाकार म्हणतील. इतक्या परिश्रमानंतर मला दोन-तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे मी अजिबात गाणार नाही, असे ती म्हणाली.