Join us

सोनम कपूरने रामगोपाल वर्माच्या ट्विटवर बोलणे टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 22:12 IST

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच महिलांशी संबंधित असलेल्या विषयावर मोकळेपणाने बोलत असते. परंतु दिग्दर्शक राम गोपाल ...

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच महिलांशी संबंधित असलेल्या विषयावर मोकळेपणाने बोलत असते. परंतु दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटर प्रकरणावर मात्र तिने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले. ती म्हणाली की, बरेचसे असे विषय आहेत, ज्यावर बोलता येऊ शकते. या विषयावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. सोनमच्या या प्रतिक्रियेवरून ती राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या टिवटिवाटावर नाराज आहे, हे मात्र नक्की. महिला दिनी रामगोपाल वर्मा यांनी, ‘महिलांनी सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना खूश ठेवावे’ असे ट्विट केले होते. वर्माच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली होती. सर्व स्तरातून त्यांचा विरोध होत असतानाच, काही महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल केले होते. सोनम कपूर गेल्या गुरुवारी मुंबई येथे मॅँगो स्टोरच्या उद्घाटन कार्यक्रमात पोहोचली होती. जेव्हा तिला राम गोपाल वर्माच्या ट्विटविषयी विचारले तेव्हा तिने यावर बोलणे टाळले. तर या कार्यक्रमात सोनमसोबत उपस्थित असलेली अभिनेत्री कोंकणा सेन हिने या ट्विट प्रकरणाविषयी काहीच माहीत नसल्याचे सांगत यावर बोलणे टाळले. यावेळी कोंकणाने म्हटले की, मी हे ट्विट बघितले नाही; मात्र अशातही मी कोणाच्या अश्लील वक्तव्याचे कौतुक किंवा समर्थन करू शकत नाही. या दोघींच्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट मात्र निश्चित झाली की, राम गोपाल वर्मा यांनी केलेले बेजाबदार ट्विट बॉलिवूडकरांच्याही पचनी पडलेले नाहीत. देशभरातून त्यांच्या या प्रतापावर संताप व्यक्त केला जात असताना बॉलिवूडकरांकडून त्यांना समर्थन मिळणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. कदाचित त्याच कारणाने रामगोपाल वर्मा यांनी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला असावा.