Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आपल्या लग्नातील मित्रांच्या अशा वागण्याने संतापली सोनम कपूर! बोलून दाखवली नाराजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 10:30 IST

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर गत ८ मे रोजी विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील प्रत्येक ...

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर गत ८ मे रोजी विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील प्रत्येक विधीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झालेत. पण सोनम कपूरला हे जराही रूचले नाही. माझे लग्न माझी खासगी बाब होती. पण माझ्या जवळच्याच मित्रांनी माझ्या सर्वाधिक खासगी क्षणांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेत, असे सोनम कपूर म्हणाली.ताज्या मुलाखतीत, तिने आपली ही नाराजी बोलून दाखवली. माझ्या लग्नावेळी माझे जवळचे मित्र आणि भाऊ-बहिणींनी माझे खूपसारे व्हिडिओ बनवले व सोशल मीडियावर पोस्ट केलेत. रणवीर व जॅकलिनने तर लग्नाच्या सर्व विधी लाईव्ह केल्यात.  या मस्ती गँगमध्ये स्वरा भास्कर, मीका सिंह, अर्जुन कपूर हेही सामील होते. लग्नात काहीही लपवण्यासारखे नव्हते, हे मला मान्य आहे. पण आम्ही सगळे प्रायव्हसीच्या गप्पा मारतो. असे असताना माझ्या लग्नाचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल करताना कुणीही याकडे लक्ष दिले नाही, असे सोनम म्हणाली. इतक्या लोकांच्या उपस्थित एक ‘बिग फॅट मॅरेज’ करण्याऐवजी मला आर्य पद्धतीने अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचे होते. मी अल्कोहोल घेत नाही. मी शाकाहारी आहे. त्यामुळे आर्य पद्धतीने लग्न हेच माझ्यासाठी योग्य होते, असेही ती म्हणाली.सोनम म्हणते, त्यात निश्चितपणे पॉर्इंट आहे. आता केवळ सोनमची ही नाराजी मस्ती गँग कशी दूर करते, तेच बघायचे आहे.ALSO READ : ​केवळ या अभिनेत्रीमुळे सोनम कपूरचे लग्न ढकलण्यात आले होते पुढेसोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनमला एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीमधील तिच्या खास मैत्रिणींची नाव विचारण्यात आली होती. यावर करिनाने जॅकलिन फर्नांडिस, करिना कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्रींची नावे सांगितली होती.