Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाची तारीख ठरली, कुटुंबीयांनी कन्फर्म केली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:59 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाच्या तारखेला घेऊन अनेक चर्चा रंगल्या आहेत. आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की सोनम ...

गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाच्या तारखेला घेऊन अनेक चर्चा रंगल्या आहेत. आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की सोनम कपूर आनंद अहुजासोबत 8 मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. कपूर आणि अहुजा कुटुंबीयांकडून लग्नाची तारीख कन्फर्म करण्यात आली आहे. 8 मे रोजीच सोनम आनंदसोबत सात फेरे घेणार आहे. अधिकृत माहितीनुसार, कपूर आणि अहुजा कुटुंबीयांना सोनम आणि आनंदच्या लग्नाची घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. सोनम आणि आनंदचं लग्न 8 मे ला मुंबईत होणार आहे. ही दोन्ही कुटुंबीयांचा खासगीबाब असल्याने याची नोंद घेण्यात  यावी. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वाद आणि प्रेमासाठी धन्यवाद.सोनम कपूर आणि आनंद अहुजा याआधी लंडनमध्ये लग्न करणार होते. मात्र सोनमच्या आजीमुळे हे लग्न मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार सोनमच्या आजीची तब्येत ठिक नाही आहे. डॉक्टरांनी त्यांना परदेशी प्रवास टाळायला सांगितला आहे.   हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम 7 मे रोजी मुंबईतील एका फाईव्ह स्टाइल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. तर वेडिंग सेरेमनी सोनमची आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार, कविता सिंगचा हा बंगला ५५ हजार स्केअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे. या बंगल्याचे नाव रॉकडेल असून, तो खूपच आलिशान आहे. मुंबईतील सर्वात महागड्या परिसरात असलेल्या या बंगल्याची किंमत सुमारे ७० कोटी रुपये इतकी आहे. ALSO READ :  लग्नाच्या काही दिवस अगोदरच सोनम कपूरने केले फोटोशूट; निळ्या रंगाच्या लहंग्यात खुलले रूप!मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सोनमचे वडिल अनिल कपूर आणि आई सुनीता आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी एक स्पेशल एक्टची तयारी करतायेत. फॅमिलीमधले बाकीचे सदस्यसुद्धा आपल्या-आपल्या डान्सच्या तयारीला लागले आहेत.