Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Kapoor Baby: सोनम कपूरच्या घरी पुन्हा पाळणा हलला! अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज; वायू झाला दादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 00:01 IST

अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा आई झाली आहे. तिने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

बॉलिवूडची मस्सकली म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूर सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनमने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा पुन्हा एकदा आई-बाबा झाले असून, सोनमने एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला आहे. कपूर आणि आहुजा कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

वायूला मिळाला छोटा भाऊ

सोनम कपूर आणि बिझनेसमन आनंद आहुजा यांनी ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. या लग्नात बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर ४ वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये सोनमने पहिल्या मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव 'वायू' ठेवण्यात आले. आता दोन वर्षांनंतर सोनम पुन्हा एकदा आई झाली असून वायूला खेळायला छोटा भाऊ मिळाला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

२०१४ मध्ये सुरू झाली होती लव्हस्टोरी

सोनम आणि आनंद यांची पहिली भेट २०१४ मध्ये झाली होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आनंदने सोनमला प्रपोज केले आणि २०१८ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले. आनंद आहुजा हा एक यशस्वी उद्योजक आहे.

सोनम कपूर सध्या लंडन आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्यास असते. पहिल्या बाळानंतर तिने अभिनयातून छोटा ब्रेक घेतला होता, मात्र आता दुसऱ्या बाळानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी परतणार, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonam Kapoor welcomes second child, baby boy, brother to Vayu.

Web Summary : Sonam Kapoor and Anand Ahuja are blessed with their second child, a baby boy. Their first child, Vayu, born in 2022, now has a younger brother. Celebrities and fans have showered the couple with congratulations.
टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूड