सोनमचे स्वत: स्वत:ला दिले आगळेवेगळे बर्थ डे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 21:48 IST
सोनम कपूरचा बर्थ डे नुकताच झाला. या बर्थ डेला सोनमला अनेक गिफ्ट मिळालेतं. पण यातल एक गिफ्ट खास होतं ...
सोनमचे स्वत: स्वत:ला दिले आगळेवेगळे बर्थ डे गिफ्ट
सोनम कपूरचा बर्थ डे नुकताच झाला. या बर्थ डेला सोनमला अनेक गिफ्ट मिळालेतं. पण यातल एक गिफ्ट खास होतं आणि ते सोनमने स्वत: स्वत:ला दिलं होतं. होय, सोनमने स्वत: स्वत:ला दिलेलं हे गिफ्ट म्हणजे हाताच्या आतल्या बाजूने गोंदवलेला टॅटू. होय, सोनमने हाताच्या मनगटाच्या आतल्या बाजूला टॅटू गोंदवलाय. ‘faith’ असा शब्द तिने गोंदवलायं शिवाय या शब्दासोबत एक सुंदर पिस म्हणजे पंखही काढलं आहे. आहे ना मस्त.. थोडं शोधल्यानंतर आम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग माहितीही मिळालीय. काय, माहितीयं, टॅटूवरून माणसाचे व्यक्तिमत्त्व ओळखता येऊ शकत. जी माणसं आपल्या शरिरावर पिस म्हणजे पंखाचा टॅटू गोंदवतात ती माणसं विचाराने मुक्त आणि धाडसी असता. त्यांना स्वतंत्र जगणे आवडते. पंख हे स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. त्यातही पक्ष्याचे पंख म्हणजे आकाशात उंच भरारी घेऊ इच्छिणाºया इच्छाशक्तीचे प्रतिक़ आपली सोनमही अशीच आहे, हे सांगणे नकोच..