बिझनेसमॅन आनंद अहुजासोबत सोनम करतेय डेटिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 10:28 IST
सोनम कपूरची लव्हलाईफ नेहमीच सिक्रेट ठेवली जाते. २०१०मध्ये सोनम ‘हेट लव्हस्टोरीज’चे दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांच्यासोबत ती डेटिंग करत आहे, ...
बिझनेसमॅन आनंद अहुजासोबत सोनम करतेय डेटिंग?
सोनम कपूरची लव्हलाईफ नेहमीच सिक्रेट ठेवली जाते. २०१०मध्ये सोनम ‘हेट लव्हस्टोरीज’चे दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांच्यासोबत ती डेटिंग करत आहे, अशी चर्चा होती. काल अक्षयने ‘रूस्तम’च्या यशाबद्दल एक पार्टी त्याच्या मुंबईतील घरी आयोजित केली होती.या पार्टीत बॉलीवूडमधील सर्व तारे-तारका उपस्थित होते. तसेच हॉलीवूडचा अभिनेता विल स्मिथ हे देखील आले होते. या पार्टीत मुळ चर्चेतील कपल म्हणजे सोनम कपूर आणि त्याच्यासोबत आलेला हॅण्डसम व्यक्ती होता. तो तिचा बॉयफ्रें ड असल्याचे बोलले जात होते.cnxoldfiles/span> आनंद अहुजासोबत ती आली होती. त्याची स्वत:ची क्लोथिंग लाईन ‘भाने’ या नावाने सुरू आहे. फिल्म स्क्रिनिंग, एअरपोर्ट्सवर सोनम या ब्रॅण्डचेच कपडे वापरते. म्हणून सर्वांच्या मनात तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे आले. आणि सोनम त्याच्यासोबत डेटींग करते असे सर्वांना वाटते आहे.