Sonam Chhabra at Cannes Film Festival 2025: ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला (Cannes) ११ मे पासून सुरुवात झाली होती. उद्या २४ मे रोजी याचा शेवट होणार आहे. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर या अभिनेत्रींनी कान्समध्ये आपला जलवा दाखवला. यासोबतच एका इन्फ्लुएन्सरनंदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कान्सच्या रेड कार्पेटवर एका भारतीय इन्फ्लुएन्सरनं आपल्या आउटफिटच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना श्रद्धांजली दिली आहे.
इन्फ्लुएन्सर सोनम छाब्राने हिने दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख असलेला ड्रेस परिधान करुन कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. चारू भसीनने डिझाइन केलेला ड्रेस तिनं परिधान केला होता. सिल्व्हर कॉर्सेट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा लांब टेल असलेला स्कर्ट तिनं घातला होता. या ड्रेसच्या टेलवर गेल्या काही वर्षात झालेल्या २००८ मुंबई, २०१६ उरी, २०१९ पुलवामा, २०२५ पहलगाम या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्याचबरोबर 'Unbroken' असंही लिहलं होतं. सोनमच्या या कृतीचं काहींनी कौतुक केलंय. काहींना मात्र बोल्ड लूक असल्याने नाराजी व्यक्त केली.
सोनम छाब्रा कोण आहे?
सोनम छाब्रा ही अभिनेत्री असण्यासोबतच, एक टॉप लाईव्ह होस्ट, अँकर, मॉडेल देखील आहे. सोनमने 'क्रिकेट' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'कुछ कहना था तुमसे' या शॉर्ट फिल्ममध्येही दिसली होती. याशिवाय तिने 'मेड इन हेवन'मध्येही काम केलं आहे. सोनमचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा प्रत्येक व्हिडीओ अपलोड होताच व्हायरल होऊ लागतो.