Join us

सोनम व राधिकाला ‘आयकॉन आॅफ इंडिया अ‍ॅवॉर्ड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 13:56 IST

बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि ‘मांझी’ फेम राधिका आपटे यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘दी 11 एडिशन ...

बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि ‘मांझी’ फेम राधिका आपटे यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘दी 11 एडिशन आॅफ एशिया व्हिजन मुव्ही अ‍ॅवॉर्ड्स’ची घोषणा करण्यात आली असून सोनमला ‘आयकॉन आॅफ इंडिया अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटातील योगदान आणि ‘नीरजा भनोत’ हिच्या बायोपिकमधील प्रशंसनीय अभिनय यासाठी तिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तिच्यासोबतच राधिका आपटे हिला देखील ‘पार्श्च्ड’,‘फोबिया’, ‘कबाली’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अभिनय क्षेत्रातील कलाकारांसाठी मानाचा आणि गौरवाचा मानला जाणारा हा दिमाखदार पुरस्कार सोहळा १८ नोव्हेंबर रोजी ‘शारजाह क्रिकेट स्टेडियम’ येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा  आपण एक भाग असल्याबद्दल सोनमला अभिमान वाटतोय. बॉलिवूडच्या कलाकारांना हवाहवासा वाटणारा असा हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याने सोनम अन् राधिका जाम खुश आहेत.  सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोघीही  सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यामुळे सध्या दोघीही सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात बिझी आहेत.बॉलिवूडमध्ये सोनम कपूरची ‘फॅशनिस्टा’ अशी ओळख आहे. पण यासोबतच परखड बोलणारी, ज्वलंत मुद्यावर हिरहिरीने मत मांडणारी आणि सामाजिक भान असलेली कलाकार म्हणूनही तिला ओळखले जात. अनिल कपूरची मुलगी असली तरी काम मिळवण्यासाठी तिने कधीही वडिलांच्या नावाचा आधार घेतला नाही. अशा दोन्ही गुणी  कलाकार सोनम आणि राधिकाचे सीएनएक्स मस्ती टीमकडून हार्दिक अभिनंदन!!