Join us

​सोनमने जिवंत केली पडद्यावरची ‘नूतन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 22:07 IST

आजही बॉलिवूडप्रेमींच्या मनात जिवंत असलेली अभिनेत्री म्हणजे नूतन... ४ जून म्हणजे नूतन यांचा वाढदिवस. या दिवशी सोनम कपूर हिने ...

आजही बॉलिवूडप्रेमींच्या मनात जिवंत असलेली अभिनेत्री म्हणजे नूतन... ४ जून म्हणजे नूतन यांचा वाढदिवस. या दिवशी सोनम कपूर हिने नूतन यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. कुणी कल्पनाही करू शकणार नाही, असे काही सोनमने केले. काय तर...सोनमने जणू तुमच्या-आमच्या मनातील नूतन पुन्हा एकदा जिवंत केली. ‘सरस्वतीचंद्र’ हा नूतन यांचा गाजलेला सिनेमा. या सिनेमातील नूतन यांनी दिलेली पोझही चांगलीच गाजली होती. सोनम कपूरने अगदी त्याच गेटअपमध्ये हुबेहुब नूतन यांच्यासारखीच पोझ दिली. नूतन पलंगावर पहुडलेल्या आहेत आणि त्यांच्या हातात पत्र आहे..अशी पोझ..सोनमने या पोझचे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय एक हृदयस्पर्शी संदेशही...तो संदेश वाचा, सोनमच्याच शब्दांत...Sonam writes, "This was an ode to #nutanmy favourite actress from the golden era of Indian cinema besides #Waheedaji .. It's her birth anniversary today and I just want to say I'm grateful for the legacy she left behind through her brilliant work, Bandhini, Saraswati Chandra, Milan, Sujata, meri Jung to name a few. You were the flag bearer for strong female roles…