Join us

​ सोनालीला झाली उपरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:44 IST

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला दीर्घकाळानंतर एक उपरती झालीय. होय, आपल्या उमेदीच्या काळात सोनालीने अनेक फेअरनेट क्रिमच्या जाहिराती केल्या. पण ...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला दीर्घकाळानंतर एक उपरती झालीय. होय, आपल्या उमेदीच्या काळात सोनालीने अनेक फेअरनेट क्रिमच्या जाहिराती केल्या. पण यापुढे अशा कुठल्याही जाहिराती मी करणार नाही,अशी ठोस भूमिका सोनालीने घेतली आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये सोनालीला तनिष्ठा चॅटर्जी हिच्यावर एका टीव्ही शोमध्ये झालेल्या वर्णभेदी टीप्पणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सोनाली तनिष्ठाची बाजू घेताना दिसली. कुणाच्याही रंगरूपावर जाहिरपणे नकारात्मक टीप्पणी करणे पूर्णत: चुकीचे आहे. तनिष्ठाने याविरूद्ध आवाज उठवला, ही अतिशय चांगली बाब आहे,असे सोनाली म्हणाली. शिवाय फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीबाबतची तिची भूमिकाही तिने स्पष्ट केली. उमेदीच्या काळात मी अनेक ब्रँण्डच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्या. पण आज माझ्याकडे असा प्रस्ताव आलाच, तर मी त्याला स्पष्ट नकार देईल. त्यावेळी मी तरूण होते. खरे तर मला पैशांची गरज होती. त्यामुळे मी या मुद्यावर विचार न करता या जाहिराती केल्या. पण आता महिलांच्या रंगरूपाबद्दलची समाजाची मानसिकता बदलायची असेल तर अशा फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीच्या पलीकडे जावून विचार व्हायला हवा, असे सोनाली म्हणाली.