कलाकार त्यांच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देताना दिसतात. अनेक सेलिब्रिटींचे व्यायाम करतानाचे जीम व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. पण, आता एका ८ महिन्यांच्या गरोदर अभिनेत्रीचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जबरदस्त योगा करताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली सेहगल आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सेहगल आठ महिन्यांची गरोदर आहे. पुढच्या महिन्यात ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोनालीने काही महिन्यांपूर्वीच ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून ती प्रेग्नंन्सीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. गरोदरपणात सोनाली योग्य ती काळजी घेताना दिसत आहे. सकस आहार घेण्याबरोबरच ती नियमित व्यायामदेखील करत आहे. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
या व्हिडिओत सोनाली विविध योगा पोझ करताना दिसत आहे. तिचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. सोनालीने रोज सकाळी उठून योगा करत असल्याचं व्हिडिओत सांगितलं आहे. ८ महिन्यांच्या गरोदर सोनालीच्या योगा पोझ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
सोनालीने 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने ७ जून २०२३ रोजी बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यापूर्वी कपल पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता लग्नानंतर ते आईबाबा होणार आहेत.