Join us

"तू केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी...", सोनाली बेंद्रेनं व्यक्त केलं आईवरील प्रेम, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:44 IST

सोनाली बेंद्रेनं तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. हम साथ साथ है, दिलजले, मेजर साब अशा कितीतरी चित्रपटातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली. बॉलिवूडमध्ये मराठमोळ्या सोनालीचा प्रवास काही सोपा नव्हता. पण, या प्रवासात तिला कायम तिच्या आईची साथ लाभली. आज अभिनेत्रीच्या आईचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं तिनं आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनाली सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिथे सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे.  सोनालीने इन्स्टाग्राम स्टोरीवर आईबरोबरचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने लिहलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी कायम ऋणी आहे. तू केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद". 

काही काळापूर्वीच सोनाली कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात करत पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाली आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात. सोनाली सध्या 'कलर्स टीव्ही'वरील 'पती पत्नी और पंगा' या कार्यक्रमामुळे चर्चेत असून यामध्ये ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून झळकत आहे. यामध्ये तिच्यासह स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसुद्धा सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी कपल सहभाग झालेले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali Bendre expresses love for her mother on birthday.

Web Summary : Sonali Bendre celebrated her mother's birthday with heartfelt wishes on social media, expressing gratitude for her constant support. The actress, a cancer survivor, is currently hosting 'Pati Patni Aur Panga'.
टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूड