Join us

गणेशोत्सवामुळे सोनाली बेंद्रेला आली घरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 13:16 IST

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

ठळक मुद्देसोनालीला येतेय घराच्या गणेशोत्सवाची आठवणगणेश चतुर्थी हा माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा सण - सोनाली

गणपती सर्वांचा लाडका दैवत... त्यामुळे गणेशोत्सव हा सण सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि विविध कारणांसाठी महत्त्वाचा असतो. कोणासाठी बाप्पा मार्गदर्शक असतो तर कुणासाठी मित्र वा सोबती. बाप्पा घरी विराजमान झाल्यावर घरात आनंद ओसंडून वाहत असतो. अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील या आनंदी वातावरणात सहभागी झाली आहे. मात्र तरीदेखील तिला एका गोष्टीची उणीव भासते आहे. याबाबतची पोस्ट सोनालीने सोशल मीडियावर केली आहे.

गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेकांनी बाप्पांचो फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘गणेश चतुर्थी हा माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा सण आहे. आज मला घरी साजरा होणाऱ्या या आनंदोत्सवाची फारच आठवण येत आहे. तुम्हा सर्वांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांवर बाप्पाची कृपादृष्टी सदैव राहो.’ सोनालीच्या या पोस्टमध्ये तिचा मुलगा बाप्पाची पूजा करताना दिसतो आहे. सोनालीच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती विलोभनीय आहे. आता बाप्पानेच सोनालीला आजारावर मात करण्यासाठी तिला बळ द्यावे आणि लवकरात लवकर बरी होऊन ती भारतात परतावी, अशी कामना तिच्या चाहत्यांनी केली आहे.

टॅग्स :सोनाली बेंद्रेगणेशोत्सव