न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शिवाय पतीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. २००२ मध्ये सोनालीने गोल्डीसोबत लग्न केले.कॅन्सर ही एकट्याने लढण्याची लढाई नाही. तुमचे संपूर्ण कुटुंब या वेदना भोगते. मी ही लढाई लढतेय, कारण गोल्डी माझ्यासोबत आहे, असे सोनालीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
माझे अख्खे कुटुंब कॅन्सरच्या वेदना भोगतेय! लग्नाच्या वाढदिवसाला भावूक झाली सोनाली बेंद्रे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:04 IST
न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
माझे अख्खे कुटुंब कॅन्सरच्या वेदना भोगतेय! लग्नाच्या वाढदिवसाला भावूक झाली सोनाली बेंद्रे!!
ठळक मुद्देकॅन्सर ही एकट्याने लढण्याची लढाई नाही. तुमचे संपूर्ण कुटुंब या वेदना भोगते. मी ही लढाई लढतेय, कारण गोल्डी माझ्यासोबत आहे, असे सोनालीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.सोनालीने १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डीसोबत लग्न केले. गोल्डी एक निर्माता आहे. अंगारे, द्रोणा, यू मी आरै हम सारखे चित्रपट त्याने प्रोड्यूस केले आहेत.