Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी म्हणणार...‘काटे नहीं कटतें...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:21 IST

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी ‘फोर्स २’मध्ये दिसणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेत. पण आम्ही आता जे ...

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी ‘फोर्स २’मध्ये दिसणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेत. पण आम्ही आता जे सांगणार आहोत, ते तुमच्यासाठी अगदी नवे असेल. होय! ८० च्या दशकातील ‘मि. इंडिया’मधील ‘काटे नहीं कटतें...’ हे गाजलेले गाणे आठवतेयं ना..आता तुम्ही म्हणाल, या गाण्याचा आणि ‘फोर्स २’चा काय संबंध! तीच तर बातमी आहे.‘फोर्स २’मध्ये सोनाक्षी आणि जॉन या आॅलटाईम फेवरेट गाण्यावर थिरकतांना दिसणार असल्याची बातमी आहे. ‘फोर्स २’च्या मेकर्सनी आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटात हा रोमॅन्टिक ट्रॅक टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  श्रीदेवी या गाण्यात निळ्या शिफॉन साडीत दिसली होती.सोनाक्षी सुद्धा तशाच निळ्या शिफॉन साडीत श्रीदेवीच्या आठवणी जाग्या करणार आहे. मस्तच ना!!!