Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’चे नवे पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 14:16 IST

सोनाक्षी सिन्हाने केवळ आपल्या अ‍ॅक्टिंग स्किलनेच नाही तर स्वत:च्या फॅशन सेन्सनेही लोकांना इंप्रेस केलेय. लवकरच सोनाक्षी सिन्हाचा ‘नूर’ हा ...

सोनाक्षी सिन्हाने केवळ आपल्या अ‍ॅक्टिंग स्किलनेच नाही तर स्वत:च्या फॅशन सेन्सनेही लोकांना इंप्रेस केलेय. लवकरच सोनाक्षी सिन्हाचा ‘नूर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीय येत आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटात सोनाक्षी पत्रकाराच्या भूमिकेतआहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर आज आऊट झाले.हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या नॉवेलवर आधारित आहे. यात सोना पाकिस्तानी पत्रकार व लेखिका नूर हिची व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या एप्रिलमध्ये  हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे पोस्टर अर्थात फर्स्ट लूक तुम्ही बघितलाच आहे. हे ‘नूर’चे तिसरे पोस्टर आहे. याआधीच्या दोन्ही पोस्टरप्रमाणेच या पोस्टरमध्ये सोना अगदी बिनधास्त मूडमध्ये दिसतेय. या पोस्टरमध्ये सोना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतेय. यावरून कदाचित सोना वेगवेगळ्या अंदाजात दिसेल, असे वाटतेय.पाकिस्तानातील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचणे आणि तिथल्या बातम्या देण्याचे काम सोना या पत्रकार म्हणून करणार आहे. या प्रवासात सोनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. याच प्रवासात सोना एका चांगल्या बॉयफ्रेन्डचा शोधही घेणार आहे. जो तिचा चांगला मित्र बनू शकेल. चित्रपटाची कथा अद्याप पूर्णपणे समोर आलेली नाही. पण या पोस्टरवरून कथेचा अंदाज लावता येऊ श्कतो.अलीकडे सोनाक्षी ‘फोर्स2’ आणि ‘अकिरा’ या चित्रपटात दिसली. यात सोनाक्षीचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला. ‘फोर्स2’मध्ये सोनाक्षी रॉ एजंटच्या भूमिकेत दिसली होती. तर ‘अकिरा’मध्ये भ्रष्ट व्यवस्थेविरूद्ध लढणाºया एका मुलीची भूमिका साकारली होती.