Join us

'मुंगडा' गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये झळकणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 16:18 IST

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या राज एन सिप्पी यांच्या 'इनकार' या चित्रपटातील 'मुंगडा' गाण्याचे रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देहेलन यांच्या दिलखेचक अदांमुळे 'मुंगडा' हे गाणे झाले होते लोकप्रिय'मुंगडा' गाण्याच्या शूटिंगला पुढील आठवड्यात होणार सुरूवात

सध्या बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन पाहायला मिळत आहेत आणि आता या रिक्रिएटेड गाण्याच्या यादीत आणखीन एका गाण्याची भर पडली आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या राज एन सिप्पी यांच्या 'इनकार' या चित्रपटातील 'मुंगडा' गाण्याचे रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा थिरकताना दिसणार आहे. इंद्र कुमार यांच्या आगामी टोटल धमाल या चित्रपटात हे गाणे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, बोमन इराणी आणि संजय मिश्रा यांच्या भूमिका आहेत. तर सोनाक्षी फक्त या गाण्यापुरती चित्रपटात झळकणार आहे.

हेलन यांच्या दिलखेचक अदांमुळे मुंगडा हे गाणे लोकप्रिय झाले होते. आताच्या काळातल्या अशाच एखाद्या अभिनेत्रीच्या आम्ही शोधात होतो. अखेर सोनाक्षीची निवड केली असून या गाण्यासाठी ती परफेक्ट आहे, असे चित्रपट निर्माते म्हणाले. तर रिक्रिएटेड व्हर्जनविषयी जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा लगेच मी होकार कळवला असे सोनाक्षी म्हणाली.पुढच्या आठवड्यात या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्याला नवा टच कशाप्रकारे देता येईल, यावर काम सुरू आहे. या गाण्याच्या अखेरीस अजय देवगणसुद्धा झळकणार असल्याची माहिती आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील मूळ गाणे सुपरहिट ठरले होते. इतकंच नव्हे तर आजही या गाण्याची तितकीच क्रेझ पाहायला मिळते. तेव्हा आता 'मुंगडा' गाण्यातील सोनाक्षीचे नृत्य प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा