Join us

सोनाक्षी सिन्हा-सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘इत्तेफाक’ची शूटिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 20:04 IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट इत्तेफाकच्या शूटिंगला सुरूवात झाली. दिग्दर्शक यश चोपडा यांच्या ...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट इत्तेफाकच्या शूटिंगला सुरूवात झाली. दिग्दर्शक यश चोपडा यांच्या १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या मुहूर्ताला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने हजेरी लावली होती. सोनाक्षी सिन्हा व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती बी.आर. फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शंस व शाहरुख खानचा रेड चिलीज इंटरटेनमेंट करीत आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी बी.आर. चोपडा यांचा नातू अभय चोपडा करीत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शॉटचा फोटो शाहरुख खानने शेअर केला आहे. शाहरुखने आपल्या ट्विटरहून फोटो शेअर करताना लिहिलेय, ‘‘यश चोपडा यांच्या चित्रपटातील माझा आवडता चित्रपट, अभय पुन्हा एकदा इत्तेफाकची निर्मिती करीत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा व अभयला माझ्याकडून धन्यावाद. रेड चिलीज इंटरटेनमेंटसोबत जोडल्या जाण्यासाठी धर्मा व बी.आर. फिल्मस्चे धन्यवाद. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटाच्या युनिट सदस्यांचा फोटो शेअर करीत इन्स्टाग्रामवर लिहले. ‘इत्तेफाकचा एक शानदार दिवस. शाहरुख सर तुमचे आभार . हे काहीतरी खास असेल.’ सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले, शाहरुख सरचे सेटवर येणे आम्हाला चांगले वाटले, त्यांनी आमच्या भूमिकाविषयी अनेक गोष्टी व रचनात्मक सल्ला दिला. धर्मा आणि रेड चिलीज सोबत हा चित्रपट करण्याची मला आतुरता लागली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची शूटिंग सुरू करताना सोनाक्षी सिन्हाने ट्विटरहून आभार मानले आहेत. तुमच्यासोबत शूटिंगचा पहिला दिवस एवढा शानदार होता. आमच्या इत्तेफाकच्या शूटिंगची शानदार सुरुवात झाली. }}}} ">http://