Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांद्राच्या समुद्रकिनारी आहे सोनाक्षी सिन्हाचा आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:53 IST

सोनाक्षीचा सीफेसिंग व्ह्यू असलेला हा आलिशान फ्लॅट पाहून डोळेच पांढरे होतील.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi  Sinha)  मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. सीफेसिंग व्ह्यू असलेला हा आलिशान फ्लॅट पाहून डोळेच पांढरे होतील. सोनाक्षी नुकतीच नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. अभिनेत्रीच्या घराची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीने नव्या घराची झलक सोशल मीडियावर दाखवत  स्वत:चं सामान स्वत: लावणं हे सगळं सोप्पं नाही असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली होती. 

सोनाक्षी सिन्हाने वांद्रे रेक्लेमेशन, रंग शारदा सभागृहाजवळ 81 ओरेटमध्ये 4,200 चौरस फुटांचे सीफेसिंग व्ह्यू अपार्टमेंट विकत घेतले आहे. अभिनेत्रीने ११ कोटी रुपयांना हे घरं विकत घेतलं आहे. सोनाक्षी सिन्हाचे हे घर 26व्या मजल्यावर आहे. हा करार Zapkey.com द्वारे ऍक्सेस केला गेला आहे. यासाठी अभिनेत्रीने 55 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

अभिनेत्रीने या वर्षी 30 मे रोजी सोशल मीडियावर नवीन घराचे आतील फोटो शेअर केले होते. ती तिच्या नवीन घरात वस्तू ठेवताना दिसली. घराच्या मोठ्या हॉलमधून सीलिंकचा सुंदर नजारा दिसतो. तर नव्या फ्लॅटमध्ये सामानांचे बॉक्स ठेवलेले दिसत होते. हे सगळं सामान तिला लावायचं असल्याने तिला त्याचा वैताग आल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणाली होती..

सोनाक्षी नुकतीच झोया अख्तर आणि रिमा कागतीच्या 'दहाड' वेबसिरीजमध्ये दिसली. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. आता ती आगामी हॉरर कॉमेडी फिल्म 'ककुडा'मध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा