Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हाने कंगना राणौतला दिले ‘हे’ सणसणीत उत्तर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 17:32 IST

आता ती इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे.

 तुम्हाला माहित आहेच की, सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वीच ट्विटरला ‘बाय-बाय’ केले आहे. नेपोटिझमच्या मुद्यांवरून वाढती ट्रोलिंग तिची डोकेदुखी बनत चालली होती, या एकाच कारणावरून तिने टिवटर सोडले होते. आता ती इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. तिने नेपोटिझमच्या मुद्यावरून कंगना राणौतला सणसणीत उत्तर दिले आहे. तिने या पोस्टद्वारे बॉलिवूड पदार्पणासाठी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असल्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे सांगितले आहे.

 नेपोटिजच्या मुद्याला वैतागून सोनाक्षी सिन्हाने ‘आग लगें बस्ती मैं, मैं अपनी मस्ती मैं’ असे म्हणत टिवटरला दोन महिन्यांपूर्वी रामराम ठोकला होता. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडचे सर्व स्टारकिड्स आता चर्चेत आलेत. युजर्सनी अनेक स्टारकिड्सना अनफॉलो देखील केल्याचे समजतेय. सध्या बॉलिवूड वर्तुळात एकमेकांवर शेरेबाजी, आरोप, प्रत्यारोप प्रचंड वाढले आहेत. यात कंगना राणौतचे नाव अग्रेसर आहे. कंगना स्टारकिड्सवर आरोप करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या व्हिडीओंना चाहत्यांची पसंतीही मिळते. आता मात्र, सोनाक्षी सिन्हानेही तिला चांगलेच खरमरीत उत्तर द्यायचे ठरवले आहे. ती लिहिते,‘नेपोटिजम हा विषय आणि तो शब्द बॉलिवूडच्या एका व्यक्तीने प्रचलित केला आहे. जिने तिचा स्वत:चा कारभार आपल्या बहिणीच्या हातात दिला आहे. मी यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्षच करत असते.’ तिने पुढे शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल सांगते,‘मला कधीही माझ्या डेब्यूसाठी माझ्या वडिलांच्या नावाचा उपयोग झाला नाही. त्यांनी कधीही बॉलिवूडच्या मोठ्या कलाकाराजवळ माझ्याबद्दल बोलले नाहीत. ‘दबंग’ सिनेमातील भूमिकेला मी साजेशी होते म्हणून केवळ मला ब्रेक मिळाला. ’

बॉलिवूड म्हटल्यावर हे सगळं तर होणारच. पण, सोनाक्षीने कंगना राणौतचे नाव न घेता तिच्यावर हे सर्व आरोप केले आहेत. आता यावर कंगना काय उत्तर देते, हे पाहूच. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती ‘दबंग ३’ मध्ये दिसली होती. तर आता संजय दत्त आणि अजय देवगण यांच्यासोबत ती दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाकंगना राणौत