Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:25 IST

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहे. अभिनेत्रीने ७ वर्षे डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर सोनाक्षीने मौन सोडले आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने २३ जूनला अभिनेता जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत लग्न केले. या लग्नाची खूप चर्चा झाली होती. या लग्न सोहळ्याला फक्त कुटुंब आणि मित्रमंडळीतील काही लोकांना आमंत्रित केले होते. सोनाक्षीच्या वांद्रे येथील रामायणा घरात हे लग्न पार पडले. रजिस्टर पद्धतीने हे लग्न पार पडले. यानंतर संध्याकाळी भव्य स्वागत समारंभ पार पडला.

या लग्नामुळे अनेक लोकांनी सोनाक्षी सिन्हाला ट्रोल केले होते कारण तिने मुस्लिम मुलाशी लग्न केले. सोनाक्षी आणि जहीरनं ना निकाह केला ना सात फेरे घेतले, त्यांनी रजिस्टर लग्न करत ट्रोलर्सचं तोंड बंद केले. आता लग्नानंतर तब्बल १२ दिवसांनी सोनाक्षी सिन्हाने ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले आहे.

लग्नानंतर आयुष्यात काय झाला बदल?झूमला दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने लग्नानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, यापेक्षा चांगलं कधी वाटलं नव्हतं. याचं सौंदर्य हेच आहे की मलाही असेच वाटत आहे. मी आनंदी आहे की लग्नापूर्वी माझे आयुष्य खूप चांगले होते आणि आता मी पुन्हा त्याच स्थितीत आहे. कामावर परत आल्याने मला खूप आनंद झालाय.

प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...काही दिवसांपूर्वी सोनाक्षीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती आणि जहीर इक्बाल हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते. यावर खिल्ली उडवत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "लग्नानंतर एकच बदल झाला आहे की आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही कारण तिथून आपण बाहेर पडल्यानंतर लोकांना वाटते की तुम्ही प्रेग्नेंट आहात. हाच फरक आहे.

सोनाक्षी झळकणार रितेश देशमुखसोबत  सोनाक्षी सिन्हा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. आता सोनाक्षी लवकरच रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत काकुडामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा