Join us
Daily Top 2Weekly Top 5

 ‘दबंग3’ माझा शेवटचा सिनेमा असेल, पण...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:00 IST

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘दबंग’ या सिनेमाला 9 वर्षे पूर्ण झालीत. याचसोबत ‘दबंग’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या सोनाक्षी सिन्हा हिनेही इंडस्ट्रीत 9 वर्षे पूर्ण केलीत

ठळक मुद्देएकीकडे शत्रुघ्न सिन्हा यासारख्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी आणि दुसरीकडे सलमान खानसोबत संधी यामुळे सोनाक्षीवर स्वत:ला सिद्ध करण्याचा मोठा दबाव होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘दबंग’ या सिनेमाला 9 वर्षे पूर्ण झालीत. याचसोबत ‘दबंग’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या सोनाक्षी सिन्हा हिनेही इंडस्ट्रीत 9 वर्षे पूर्ण केलीत. ‘दबंग’मध्ये सोनाक्षीने साकारलेली रज्जोची भूमिका चांगलीच गाजली होती. हा सोनाक्षीचा पहिला सिनेमा होता. बॉलिवूड पदार्पणाला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनाक्षीने एका ताज्या मुलाखतीत ‘दबंग’च्या खास आठवणी शेअर केल्यात.

‘दबंग हा माझा पहिला सिनेमा. हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच खास राहिल. याच फ्रेन्चाइजीचा तिसरा भाग अर्थात ‘दबंग3’ येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. हा माझा शेवटचा सिनेमा असेल,’ असे ती म्हणाली. वाचून धक्का बसला ना? पण शेवटचा म्हणजे, सोनाक्षीच्या सिनेकारकिर्दीतील शेवटचा सिनेमा नाही तर चालू वर्षातील शेवटचा सिनेमा.

होय, या वर्षात सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ हा तिचा यावर्षातील शेवटचा चित्रपट असेल. 2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल असे तीन चित्रपट केलेत. ते प्रदर्शितही झालेत. ‘दबंग3’ हा तिचा यंदाचा चौथा सिनेमा असणार आहे.

येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटात सोनाक्षी पुन्हा एकदा सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.9 वर्षांच्या बॉलिवूड प्रवासात सोनाक्षीने बराच मोठा पल्ला गाठला. पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत संधी मिळाली.

एकीकडे शत्रुघ्न सिन्हा यासारख्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी आणि दुसरीकडे सलमान खानसोबत संधी यामुळे सोनाक्षीवर स्वत:ला सिद्ध करण्याचा मोठा दबाव होता. पण सोनाक्षीने या दबावाला बळी न पडता, स्वत:ला सिद्ध केले. वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वत:वर काम करत राहिली.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा