Join us

​लवकरच ‘एन्गेज्ड’ होणार सोनाक्षी सिन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 14:47 IST

नव्या वर्षांत सोनाक्षी सिन्हा आनंदाची बातमी देणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी होणार, असे दिसतेय. ...

नव्या वर्षांत सोनाक्षी सिन्हा आनंदाची बातमी देणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी होणार, असे दिसतेय.  आम्ही सोनाक्षीच्या रिल लाईफबद्दल नाही तर तिच्या रियल लाईफबद्दल बोलतोय. होय, सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेन्ड बंटी सजदेह याच्यासोबत लवकरच ‘एन्गेज्ड’ होणार असल्याची खबर आहे. मीडिया रिपोर्ट खरे मानाल तर लवकरच सोनाक्षी व बंटीचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून बंटी आणि सोनाक्षी यांच्यातील जवळीक चांगलीच वाढलीयं. अलीकडे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले. काही दिवसांपूवीर्ही बंटी व सोनाक्षी यांचा साखरपुडा झाल्याची बातमी आली होती. अर्थात ही बातमी खोटी असल्याचे सोनाक्षीने स्पष्ट केले होते. एका मुलाखतीत सोनाक्षीला बंटीसोबतच्या साखरपुड्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर सोनाक्षी चांगलीच संतापली होती. माझ्या बोटात तुम्हाला अंगठी दिसतेय का? मग या प्रश्नाला अर्थच काय? अशा शब्दांत साखरपुड्याची बातमी तिने नाकारली होती. पण आता पुन्हा एकदा सोनाक्षी व बंटीच्या साखरपुड्याची बातमी चर्चेत आहे. बंटी हा सलमान खानचा भाऊ सोहेल खान याचा साळा आहे. सोहलची पत्नी सीमा खान हिचा बंटी हा भाऊ. सन २०१२ पासून सोनाक्षी व बंटी परस्परांना डेट करत आहेत. बंटीने सोनाक्षीसोबत विवाह केलाच तर तो त्याचा दुसरा विवाह असेल. बंटीने याआधी अंबिका चौहानसोबत लग्न केले. मात्र हे लग्न केवळ चार वर्षे टिकले. सोनाक्षीपूर्वी बंटी अनेक अभिनेत्रींना डेट करून चुकला असल्याचेही बोलले जाते. यात नेहा धूपिया, दिया मिर्झा व सुश्मिता सेन यांची नावे आहेत. पण कदाचित सोनाक्षीबद्दल बंटी गंभीर आहे.ALSO READ : ​घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी सिन्हा करणार का साखरपुडा?​ पाहा सोनाक्षीची हमशक्ल साहेबा...