Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधीकाळी अशी दिसायची सोनाक्षी सिन्हा; चित्रपटांसाठी तीस किलो वजन केले कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 22:26 IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ‘हॅप्पी भाग जाएगी रिटर्न’ आणि ‘गोलमाल इन न्यू यॉर्क’ या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ‘हॅप्पी भाग जाएगी रिटर्न’ आणि ‘गोलमाल इन न्यू यॉर्क’ या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटातून सुरूवात करणारी सोनाक्षी आज इंडस्ट्रीमध्ये आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. खरं तर सोनाक्षीने इंडस्ट्रीत कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून सुरुवात केली होती. तिला अभिनेत्री बनायचे नव्हते. परंतु सलमान खानच्या सांगण्यावरून तिने अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचा विचार केला. मात्र यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अभिनेत्री बनण्यासाठी तिला तब्बल ३० किलो वजन कमी करावे लागले. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, चित्रपटांमध्ये येण्याअगोदर सोनाक्षीचे वजन ९० किलो होते. सलमान खानच्या सांगण्यावरून तिने ३० किलो वजन कमी केले. पुढे तिने सलमानसोबतच ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, ‘वजन कमी करणे सोपी गोष्ट नाही. मी जिमचा तिरस्कार करायची, मला जिमची अ‍ॅलर्जी होती. मी जिमपासून दूर जावू इच्छित होते. परंतु मी ठरविले होते की, मला वजन कमी करायचे आहे. कारण मी जी गोष्ट ठरविते, ती पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. दरम्यान, सोनाक्षीला एक्सरसाइज करायला अजिबातच आवडत नसे. शिवाय जंक फूड खायला तिला प्रचंड आवडायचे. तिने वाढत्या वजनाची कधीच चिंता केली नव्हती. मात्र प्रॉपर वर्कआउट आणि डायट प्लान फॉलो केल्याने तिचे वजन कमी झाले. सोनाक्षीने एका मुलाखतीत सलमानचे आभार मानताना म्हटले होते की, सलमाननेच मला वजन कमी करण्यासाठी मोटीवेट केले होते. सलमानच्या सांगण्यावरूनच मी वजन कमी करण्याचा निर्धार केला होता. सोनाक्षीने म्हटले की, वजन कमी करण्याचा प्रवास माझ्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. कारण जिममध्ये ट्रेनिंग करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. वजन कमी करण्यासाठी मी शाहिद कपूरचा ट्रेनर हायर केला होता. त्याने मला कार्डिओ एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग, प्लेइंग टेनिस, जिम, हॉट योगा आदींची एक्सरसाइज दिल्याचे सांगितले. आता सोनाक्षी नियमित वर्कआउट करताना डायटवरही विशेष लक्ष देताना दिसते.