Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोनाक्षी सिद्धार्थसोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 17:36 IST

सोनाक्षी सिन्हाने अलीकडे टिष्ट्वटरवर तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल लिहिले होते. नवा प्रोजेक्ट सुरु करायला मी उत्सूक आहे, असे म्हणाली होती. ...

सोनाक्षी सिन्हाने अलीकडे टिष्ट्वटरवर तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल लिहिले होते. नवा प्रोजेक्ट सुरु करायला मी उत्सूक आहे, असे म्हणाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी ‘अकिरा’ या अ‍ॅक्शन मुव्हीमध्ये गुंतली होती. आता मात्र ती नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, हे पक्के झालेय. हा नवा प्रोजेक्ट म्हणजे, ‘इत्तेफाक’चा रिमेक.यामध्ये सोनाक्षी सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.  हा क्राईम थ्रीलर अभय चोप्रा दिग्दर्शित करणार आहे.मध्यंतरीच्या काळात सोनाक्षीने विपुल शहाच्या ‘फोर्स २’ची शूटींग केली. यानंतर सोनाक्षी विपुल शहाच्याच ‘नमस्ते इंग्लंड’मध्येही झळकणार आहे. येत्या व पुढच्या वर्षांत सोनाक्षीच्या पदरात अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट आहेत. तेव्हा बेस्ट लक सोनाक्षी...