Join us

​‘दबंग3’मध्ये सोनाक्षी नाही परिणीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 21:32 IST

होय, आत्तापर्यंत ‘दबंग’ सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच लीड हिरोईन म्हणून दिसली आणि रज्जोच्या भूमिकेत प्रेक्षकांनाही ती भावली. पण आता ...

होय, आत्तापर्यंत ‘दबंग’ सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच लीड हिरोईन म्हणून दिसली आणि रज्जोच्या भूमिकेत प्रेक्षकांनाही ती भावली. पण आता अरबाजला ‘दबंग 3’मध्ये सोनाक्षी नकोय. सोनाक्षीऐवजी नवी हिरोईन घेण्याचे अरबाजने जवळजवळ नक्की केलयं आणि ही हिरोईन कोण माहितीयं..होय, परिणीती चोपडा. सध्या ‘ढिशूम’मधील आयटम साँगमुळे परिणीत जोरात आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रज्जोच्या भूमिकेसाठी परिणीती अगदी फिट आहे, असे अरबाजला वाटते आहे. यासंदर्भात अरबाज लवकरच परिणीतीशी संपर्क साधणार असल्याचीही खबर आहे. सोनाक्षीने अरबाजचा ‘डॉली की डोली’ नाकारला आणि तेव्हापासून अरबाज व सलमानशी सोनाक्षीचे बिनसले. अर्पिताच्या लग्नातही सलमान व सोनाक्षीमधील मतभेद दिसले.  सलमानच सोनाक्षीशी काम करण्यास उत्सूक नसल्याने अरबाजच्या प्रोडक्शन हाऊसने नव्या हिरोईनचा शोध चालवला आहे. हा शोध कदाचित परिणीतीपर्यंत येऊनच थांबलायं, तूर्तास तरी असेच दिसतेयं.