'दबंग 3' मध्ये काम करण्यासाठी सोनाक्षीने मागितले कोटींची रक्कम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:05 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या अपोझिट दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. मात्र आज रज्जो ...
'दबंग 3' मध्ये काम करण्यासाठी सोनाक्षीने मागितले कोटींची रक्कम ?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या अपोझिट दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. मात्र आज रज्जो दबंग सिरिजच्या चित्रपटात काम करण्यासाठी 3 कोटींची मागणी करते आहे. सोनाक्षीला दंबग चित्रपटाने वेगळी ओळख निर्माण करुन दिली. मात्र सोनाक्षीने याचित्रपटासाठी खान ब्रदर्सकडून मोठी रक्कम मागितली आहे. तुम्ही जर सोनाक्षीने दबंग चित्रपटात काम करण्यासाठी 3 कोटी मागितले असा विचार करत असाल तर थोडे थांबा कारण सोनाक्षीने अशी कोणतीच मागणी केलेली नाही. त्याचे झाले असे की सोनाक्षीचा 'वेलकम टू न्यूयॉर्क' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये अरबाज खान आणि सोहेल खानसुद्धा आहेत. चित्रपटातील सीनमध्ये अरबाज खान सोनाक्षीला फोन करुन दबंग 3 ची स्क्रिप्ट फायनल झाल्याचे सांगतो आणि सोनाक्षीला त्याला यात काम करण्यासाठी तब्बल 3 कोटींची मागणी करते. त्यानंतर अरबाज तिला म्हणतो मीच तुला या इंडस्ट्रित लाँच केले आहे आणि तू माझाकडूनच ऐवढी रक्कम मागतेस. हे तर झाले चित्रपटाबाबत मात्र खऱ्या आयुष्यात अरबाज खानने दबंगच्या सिरिजमधून सोनाक्षी सिन्हाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जाते आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला होता की, सोनाक्षी सिन्हा 'दबंग 3' चा भाग नसणार आहे. स्क्रिप्टच्या अनुसार कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. अरबाज खान पुढे म्हणाला की, या वर्षाच्या मध्यापासून दबंग 3 चे शूटिंग सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. ALSO READ : सोनाक्षी सिन्हा दिसणार एका एेतिहासिक चित्रपटातसध्या सलमान खान सलमान रेस 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहेत. यात सलमानसह जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यानंतर सलमान 'दबंग3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.