Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंटीसोबत पुन्हा दिसली सोना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 14:19 IST

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. अर्जून कपूर आणि रणवीर सिंह यांच्यासोबत कधीकाळी सोनाचे नाव ...

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. अर्जून कपूर आणि रणवीर सिंह यांच्यासोबत कधीकाळी सोनाचे नाव जुळले. आता सलमानचा भाऊ सोहेल खान याचा साळा बंटी सचदेव याच्यासोबत सोनाक्षीच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आहे. अर्थात सोनाक्षी याबद्दल काहीही बोललेली नाही. पण शेवटी ही बाब लपून लपणार किती? चाळीशीपेक्षा अधिक वयाच्या बंटीसोबत सोना अनेकदा दिसली आहे. कालपरवा सोना पुन्हा एकदा बंटीसोबत ‘मटरगश्ती’ करताना कॅमे-यात कैद झाली. गुरुवारी रात्री दोघेही एका नाईट क्लबमधून बाहेर पडताना दिसले.अर्थात यावेळी बंटीपासून अधिकाधिक दूर राहण्याचाच प्रयत्न सोना करताना दिसली. कदाचित कॅमेरे आपल्या मागावर आहेत, याची खबर तिला लागली असावी. त्यामुळे बंटीपासून तिने चार हात दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र चेहºयावरील लाजरे भाव ती लपवू शकली नाही. बंटी कुणी बॉलिवूड अभिनेता वा दिग्दर्शक नाही. तर एक ब्रँड एंडोर्समेट डील्स मॅनेजर आहे. २०१२ मध्ये बंटीने सोनासाठी एंडोर्समेंट डील्स मॅनेज करणे सुरु केले. यानंतर काही काळातच बंटी व सोनाच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या. मात्र सोनाने कायम या बातम्यांचा इन्कार केला. आता हा इन्कार किती खोटा अन् किती खोटा, हे सोनाच जाणो!