Join us

रविना टंडनने ज्या मुलाला सेटवरून हाकलून दिले होते आज तोच मुलगा आहे बॉलिवूडचा सुपरस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 19:20 IST

९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री रविना टंडन हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगत असते. परंतु तिच्याबद्दल ही बाब कदाचित कोणालाच माहिती ...

९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री रविना टंडन हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगत असते. परंतु तिच्याबद्दल ही बाब कदाचित कोणालाच माहिती नसेल. होय, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, रविनाने असे काही केले की, सगळेच दंग झाले. आज तिचा हाच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचे झाले असे की, रविना तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. सेटच्या जवळच एक बारा वर्षांचा मुलगा रविनाला बघून विचित्र हावभाव करीत होता. हा मुलगा शूटिंग बघण्यासाठी आला होता. मात्र, त्या मुलाचे हे हावभाव बघून रविनाला सहन झाले नाही. तिने त्या मुलाला सेटवरून हाकलून लावले. मात्र ज्या मुलाला रविनाने सेटवरून हाकलले होते तो मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. होय, आम्ही अभिनेता रणवीर सिंगविषयी सांगत आहोत. ज्या मुलाला रविनाने सेटवरून हाकलून दिले होते तो मुलगा रणवीरच होता. त्याला लहानपणापासूनच चित्रपटात येण्याचा छंद होता. त्यासाठी तो नेहमी शूटिंग बघण्यासाठी जायचा. त्याचवेळी हा प्रसंग घडला. रणवीरविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स आॅफिसवर बंपर कमाई करतो. त्याने २०१० मध्ये ‘बॅण्ड बाजा बरात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आज तो बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता आहे. सध्या तो बहुप्रतिक्षित ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे.