Join us

संस्कारी बाप का बिघडा हुआ बेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 12:07 IST

आलोक नाथ यांनी अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बापाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांची ओळख ही संस्कारी बाबूजी अशीच आहे. काही ...

आलोक नाथ यांनी अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बापाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांची ओळख ही संस्कारी बाबूजी अशीच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या या संस्कारी भूमिकांविषयी अनेक जोक्सदेखील सोशल मीडियावर फिरत होते. चित्रपटात संस्कारी बापाची भूमिका साकारणाऱ्या आलोकनाथ यांच्या मुलाला नुकतेच पोलिसांनी अटक केले आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात पोलिसांनी आलोक नाथ यांचा मुलगा शिवांग याला अटक केली असून मंगळवारी सकाळी त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवांग त्याच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. घरी परतत असताना पोलिसांनी त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने गाडी न थांबवता ती वेगाने पळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदीला असणाऱ्या पोलिसांना या गाडीची माहिती कळवली आणि त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी त्याला अडवले. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी शिंवागने पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शिवांगला अटक केली असून त्याची गाडीदेखील जप्त केली आहे. शिवांगला 2600 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.