Son Chiriya first look: बंदूक खांद्यावर टाकून कुठे निघाली भूमी पेडणेकर??
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:11 IST
फोटोतील हा चेहरा लगेच ओळखणे कठीण आहे. थोडे निरखून बघितल्यावर ही भूमी पेडणेकर असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आता खांद्यावर ...
Son Chiriya first look: बंदूक खांद्यावर टाकून कुठे निघाली भूमी पेडणेकर??
फोटोतील हा चेहरा लगेच ओळखणे कठीण आहे. थोडे निरखून बघितल्यावर ही भूमी पेडणेकर असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आता खांद्यावर बंदूक अडकवून भूमी कुठे निघाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की, हा भूमीच्या आगामी चित्रपटातील लूक आहे. होय, ‘सोन चिरैया’ या चित्रपटात भूमी दिसणार आहे. यात ती चंबळच्या खो-यातील एका महिला दरोडेखोराची भूमिका साकारणार आहे. ‘इश्किया’,‘डेड इश्किया’ आणि ‘उडता पंजाब’ असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. ‘सोन चिरैया’मध्ये १९७० च्या दशकातील कथा पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे. भूमी पेडणेकर आणि सुशांत सिंग राजपूतसह मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.ALSO READ : भूमी पेडणेकरला करायचा आहे या हॉट अभिनेत्रीचा फोन नंबर ब्लॉक, पण का?भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी यश राज बॅनरमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. यानंतर भूमीने यशराजसोबत तीन चित्रपट साईन केलेत. अलीकडे भूमी अक्षय कुमारसोबत ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटात झळकली.