Join us

लग्नानंतर काहीसे असे क्षण व्यतीत करीत आहेत विरुष्का, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 21:15 IST

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण व्यतीत करीत आहेत. वाचा सविस्तर!

आपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणारी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे इमले बांधणारा विराट कोहली अखेर काल विवाहाच्या बंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाची बातमी समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला. कालपासूनच विरुष्काच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. या दोघांचे लग्न एवढ्या शाही पद्धतीने झाले की, त्यांच्या फोटोवरून नजर बाजूला करणे त्यांच्या चाहत्यांना अवघड होत असेल. असो, आता आम्ही या नवदाम्पत्याचे आणखी काही फोटो तुम्हाला दाखविणार आहोत. विराट-अनुष्काचे नुकतेच समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. लग्नानंतर हे दोघे इटलीतील टस्कनी शहराचे सौंदर्य अनुभवताना दिसत आहेत. फोटोत दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे. वास्तविक त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. परंतु दोघांचा हा फोटो एवढा सुंदर आहे की, त्यांच्या चाहत्यांकडून त्यास वाºयासारखे व्हायरल केले जात आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या दाम्पत्याच्या सुखी जीवनासाठी प्रार्थनाही केली जात आहे.  काल रात्रीच अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटोज् शेअर करताना लग्नाची बातमी दिली होती. तिने लिहिले होते की, ‘आज आम्ही दोघांनी कायम प्रेमाच्या बंधनात अडकण्यासाठी एकमेकांना वचन दिले आहे. तुमच्यासोबत ही बातमी शेअर करताना आम्ही खूप आनंदी आहोत. मित्र, परिवार आणि चाहत्यांच्या प्रेमासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. आमच्या या सुंदर प्रवासात सहप्रवासी बनलेल्या सर्वांचे धन्यवाद!’ पुढे विराटनेही हाच मॅसेज शेअर करीत त्याच्या लग्नाची बातमी दिली.