Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मनोरंजन जगतातील काही ‘Versatile’ चेहरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 16:07 IST

गेल्या काही वर्षांत अनेक बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका करताना दिसत आहे. स्वत:ला एकाच साच्यात जखडून न ठेवता, वेग-वेगळ्या ...

गेल्या काही वर्षांत अनेक बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका करताना दिसत आहे. स्वत:ला एकाच साच्यात जखडून न ठेवता, वेग-वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारण्याचे आव्हान अनेकांनी लीलया पेलले आहेत. याही पुढे  जात, विविध माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारेही कलाकार आहेत. टीव्ही, सिनेमा, थिएटर, शॉर्ट फिल्म्स, वेब सीरिज असे काहीच या कलाकारांना वर्ज्य नाही. अशाच अनेक रूपात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाºया अशाच काही कलाकारांविषयी...रसिका दुग्गलथिएटर टू वेब सीरिज, होस्टिंग टू अ‍ॅक्टिंग, टीव्ही शो टू फिल्म्स...अशा प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने वावरणारी अभिनेत्री म्हणजे रसिका दुग्गल.‘बॉम्बे टॉकिज’,‘किस्सा’ अशा अनेक चित्रपटांत रसिका दिसली. याशिवाय ‘ पीओडब्ल्यू : बंदी युद्ध के’ या टीव्ही शोमध्ये सुद्धा रसिकाने तिचे टॅलेंट दाखवले. ‘चटनी’ या शॉर्ट फिल्म्समध्ये ती टीस्का चोप्रा आणि आदिल हुसैनसोबत झळकली. या शॉर्ट फिल्मने फिल्मफेअरचा बेस्ट शॉर्टफिल्मचा अवार्ड पटकावला. लवकरच रसिका नंदिता दासच्या ‘मंटो’मध्ये दिसणार आहे. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसेल.सुमीत व्यास ‘वो हुये ना हमारे’ या टीव्ही शोतून सुमीत व्यासने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. यानंतर तो ‘रहेना है तेरी पलकों की छांव में’ या शोमध्ये दिसला. यानंतर ‘परर्मनेंट रूममेट्स’मधून त्याने बेव सीरिज डेब्यू केला. ‘इंग्लिश विंग्लिश’,‘गुड्डू की गन’,‘पार्च्ड’,‘औरंगजेब’ अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. आता सुमीत ‘रिबॉन’ या चित्रपटात कल्की कोच्लिनसोबत दिसणार आहे. याशिवाय स्वरा भास्करसोबत एका अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटातही तो झळकणार आहे. एवढेच नाही तर करिना कपूरच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ यातही त्याची वर्णी लागल्याचे कळतेय.कल्की कोच्लिनकल्कीने स्वत:ला कुठल्याच इमेजमध्ये बांधून ठेवले नाही. सुरुवातीपासून लहान-मोठ्या अशा कुठल्याही असो पण वैविध्यपूर्ण भूमिकेतच ती दिसली. ‘मार्गारेट विद स्ट्रा’,‘एक थी डायन’,‘ये जवानी है दिवानी’ अशा अनेक चित्रपटात कल्की दिसली. अलीकडे ती ‘स्मोक’नामक वेबसीरिजमध्ये झळकली. अलीकडे एक टीव्ही शोही तिने होस्ट केला.रत्ना पाठकरत्ना पाठक यांच्या अभिनयाची सुरुवात झाली तर थिएटरपासून. पण यानंतर रत्ना यांनी मनोरंजनाच्या सगळ्यांत माध्यमांना जवळ केले. थिएटर, टेलिव्हिजन, शॉर्ट फिल्म्स, सिनेमा असे सगळेच. छोट्या पडद्यावर ‘माया साराभाई’ नावाने ओळखल्या जाणाºया रत्ना यांची ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही विनोदी मालिका प्रचंड गाजली होती. अनेक चित्रपटात त्या दिसल्या आहेत.मिथिला पालकरकुरळ्या केसांची मिथिला पालकर हिच्या ‘गर्ल इन दी सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसीरिज प्रचंड गाजल्या. ‘माझा हनीमून’ या मराठी शॉर्ट फिल्म्समधून मिथिलाने आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता. यानंतर ती ‘कट्टी बट्टी’ या सिनेमात दिसली. अलीकडे मिथिलाचा ‘मुरांबा’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. काही मराठी गाण्यांना मिथिलाने आवाज दिला.  निमरत कौर‘लंचबॉक्स’ या चित्रपटात निमरत कौर एका गृहिणीच्या भूमिकेत दिसली. एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून निमरत ओळखली जाते. थिएटरपासून अभिनयाची कारकिर्द सुरुवात करणारी निमरतने ‘बगदाद वेडिंग’, ‘आॅन अबाऊट वूमेन’,‘रेड स्पॅरो’ अशा नाटकात काम केले. यानंतर ती काही म्युझिक अल्बममध्ये झळकली.  अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’मध्येही ती दिसली.तनिष्ठा चॅटर्जीतनिष्ठा चॅटर्जी म्हणजे एक बहुआयामी अभिनेत्री. बॉलिवूडपासून हॉलिवूड, प्रादेशिक सिनेमा असे सगळे तिने केलेय. भारतात थिएटरपासून सुरुवात करणाºया तनिष्ठाने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या थिएटर डायरेक्टर्ससोबत काम केले. अनेक हॉलिवूडपटांत ती दिसली. याशिवाय बºयाच बॉलिवूड सिनेमांतही ती होती. अलीकडे आलेल्या ‘पार्च्ड’चित्रपटातील तिचा अभिनय अफलातून होता. बंगाली चित्रपटसृष्टीत तनिष्ठाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. याशिवाय बेव सीरिजमध्येही ती झळकली आहे.