Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे काही सीन्सचे होणार Reshoot! का ते वाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:25 IST

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा आगामी सिनेमा बघण्यास सगळेच आतूर आहेत. आमिर खानला बॉलिवूडचा ...

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा आगामी सिनेमा बघण्यास सगळेच आतूर आहेत. आमिर खानला बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. आता या यादीत निर्माता आदित्य चोप्रा यांचेही नाव सामील झाले आहे. होय, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा निर्माता म्हणून आदित्य चोप्रा या चित्रपटाशी जुळलेला आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. अलीकडे माल्टा येथे या चित्रपटाचे शूटींग झाले. येथे चित्रपटाचे काही अ‍ॅक्शन सीन्स शूट केले गेले होते. या शूटनंतर टीम भारतात परतलीही. पण आदित्यला म्हणे, हे अ‍ॅक्शन सीन्स दुस-यांदा शूट करायचे आहेत.खरे तर चित्रपटाचे जवळपास सगळे शूटींग पूर्ण झाले आहे. सध्या याच्या एडिटींगचे काम सुरु आहे. पण चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सबद्दल आदित्य समाधानी नसल्याचे कळतेय. त्यामुळे दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांना आदित्यने काही सीन्स नव्याने शूट करण्याचे आदेश दिल्याचे कळतेय. या आदेशानंतर हे सीन्स यशराज स्टुडिओजमध्ये शूट केले जाणार आहेत. अर्थात हे सीन्स कुठल्या अभिनेत्यावर चित्रीत केले गेले आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता ही बातमी आमिरपर्यंत पोहोचली असणारच. पण तूर्तास तरी आमिर खान व त्याची पत्नी किरण राव हे दोघेही येत्या काही दिवस घरात कैद राहणार आहे. दोघांनाही स्वाईन फ्ल्यूने ग्रासले आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व अमिताभशिवाय कॅटरिना कैफ आणि ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिचे आयटम साँगही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी आमिरने आपले लूक चेंज केले आहे.