बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा (Actor Govinda) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अलिकडे त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. या काळात गोविंदा फक्त रिॲलिटी शोमध्येच दिसला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गोविंदाने इंडस्ट्रीतील त्याच्या अनुभवांबद्दल सांगितले. यादरम्यान, अभिनेत्याने सांगितले की इंडस्ट्रीतील अनेक लोक जाणूनबुजून त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इंडस्ट्रीतून हाकलून देऊ इच्छित होते.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 'पार्टनर' फेम अभिनेत्याने त्याच्याबद्दल पसरलेल्या बातम्यांबद्दल सांगितले आणि म्हणाला की, "जेव्हा ते लिहित होते की माझ्याकडे काम नाही, तेव्हा मी १०० कोटी रुपयांचा चित्रपट सोडला होता. मात्र, नंतर मी स्वत:ला आरशात बघत होतो आणि मी हा चित्रपट का सोडला म्हणून स्वत:ला थापड मारत होतो. मी स्वतःशीच म्हणालो, 'तू वेडा झाला आहेस, त्या पैशाने तू तुझं आयुष्य चालवू शकला असतास.' मात्र स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि आपल्या अंतरआत्म्याचे ऐकणे खूप महत्वाचे आहे."
"माझ्या विरुद्ध रचला कट"मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने भूतकाळाची आठवण करून दिली आणि म्हणाला, "त्यावेळी, माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली, माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना मला सिनेइंडस्ट्रीतून काढून टाकायचे होते. मला समजले की मी एक अशिक्षित व्यक्ती आहे आणि सुशिक्षित लोकांमध्ये आलो आहे. त्यांना मला काढून टाकायचे आहे. मला त्यांचे नाव खराब करायचे नाही, पण ते कोणत्या थराला जातील हे मला माहीत नव्हते. माझ्याविरुद्ध कट रचले गेले, लोकांना माझ्या घराबाहेर बंदुकांसह पकडण्यात आले. या सगळ्या कटानंतर माझा स्वभाव बदलला.
शेवटचा २०१९ मध्ये गोविंदा दिसला रुपेरी पडद्यावरवर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गोविंदा शेवटचा २०१९च्या 'रंगीला राजा' चित्रपटात दिसला होता. तेव्हापासून तो रुपेरी पडद्यापासून गायब आहे. मात्र, या काळात गोविंदा कधी पायाला गोळी लागल्याने तर कधी पत्नी सुनीतासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिला.