सोहा अली खान तशी गुणी अभिनेत्री. पण बॉलिवूडमध्ये ती फारसा जम बसवू शकली नाही.अर्थात म्हणून बॉलिवूड सोडून जाण्याचा सोहाचा अजिबात विचार नाही. याऊलट बॉलिवूडशी संबंधित वेगळ्या क्षेत्रात सोहा स्वत:चे नशीब आजमावणार आहे. होय, सोहा निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. सोहा व तिचा पती कुणाल खेमू एक प्रॉडक्शन हाऊस उघडणार आहेत. खुद्द सोहानेच ही माहिती दिली. मी आणि कुणाल दोघे मिळून एक प्रॉडक्शन हाऊस उघडत आहोत. आमच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘रिनीगेट फिल्म्स’ असे असेल. आम्ही चित्रपटाची सहनिर्मिती करू. आमच्याकडे नवनव्या कल्पना आहेत. आम्ही त्याजोरावर वेगवेगळ्या लोकांसोबत मिळून चित्रपट बनवू. आमचा पहिला चित्रपट एका हयात असलेल्या महान व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर बेतलेला असेल. मात्र ही व्यक्ती अभिनय व क्रीडा क्षेत्रातील नक्कीच नाही, असे सोहाने सांगितले. या चित्रपटात सोहा स्वत: काम करणार वा नाही, हे अर्थात सोहाने स्पष्ट केलेले नाही. सोहा काहीतरी नवीन करतेय,ही नक्कीच चांगली बाब आहे. सो, आॅल दी बेस्ट सोहा!
सोहाचे ‘पुढचे पाऊल’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 20:29 IST