सुलतानच्या प्रमोशनला सोहेलने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 16:16 IST
सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान अनेक फंडे वापरत असला तरी सुलतानच्या प्रमोशनला सोहेल खानने नकार दिल्याचे समोर आले ...
सुलतानच्या प्रमोशनला सोहेलने दिला नकार
सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान अनेक फंडे वापरत असला तरी सुलतानच्या प्रमोशनला सोहेल खानने नकार दिल्याचे समोर आले आहे.डेसी शाहच्या बेगम जानचा प्रयोग मुंबईच्या रंगशारदामध्ये पार पडला. यावेळी सलमान खान सुलतानच्या प्रमोशनच्या दृष्टीने ‘बिर्इंग सुलतान’ नावाचा टी शर्ट घालून आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे लक्ष्य सलमान खान हेच होते. याचवेळी त्याचा भाग सोहेल खान देखील या कार्यक्रमास उपस्थित होता. मात्र त्याने ‘बिर्इंग सुलतान’ हा टी शर्ट परिधान केलेला नव्हता. त्याने ‘स्टार वॉर्स’ची टोपी घातली होती. या नाटकाच्या निमित्ताने दोन भावांमधील सौहार्दाचे नाटक समोर आले. सोहेल खानने आपली वेगळी पायवाट धरली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. सलमान खानसमोरच त्याने सरळसरळ प्रमोशनला नकार दिला आहे. सुलतानच्या प्रमोशनच्या निमित्ताने या भावांमधील वेगळेपण पुढे चालू राहते काय किंवा त्यांच्या दोघात समेट घडते हे पाहण्याजोगे ठरेल.