Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहेल खानने विकली मुंबईतील प्रॉपर्टी, इतक्या कोटींमध्ये झाला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:49 IST

Sohail khan: सोहेल खानवर आली प्रॉपर्टी विकायची वेळ?

बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याने नुकतीच त्याची मुंबईतील एक प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट इथे असलेलं त्याचं एका मोठं कमर्शिअल ऑफिस त्याने कोटयवधींनी विकलं आहे. ही माहिती प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रॉपर्टीसाठी मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, सोहेल खानची ही प्रॉपर्टी बिलकिश असोसिएट्स प्रायव्हेट लिमिडेटने खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीची किंमत ५ कोटी ९० लाख रुपये असून या जागेचा एरिया १,५५० स्क्वेअर फीट इतक आहे. सोबतच तीन कार पार्किंगची जागादेखील आहे. या जागेवर आता नवी कंपनी बँकिंग आणि फायनान्शिअल इन्स्टिटयूशनला डेब् रेजोल्यूशन, क्रेडिट आणि सेल्स या सेवा पूरवणार आहे.

सोहेल खानच्या या प्रॉपर्टीची डील २७ मार्च २०२६ रोजी झाली आहे. यासाठी ३५.४० लाख रुपयांचं स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशनची फी भरण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी अर्पिता खानने सुद्धा मुंबईतील खार भागात असलेली अपार्टमेंट विकली. तिने २२ कोटींमध्ये हा व्यवहार केला होता. तर दुसरीकडे अरबाज खानने फेब्रुवारीमध्ये मुंबईतील जोगेश्वरी येथे २.७८ कोटींची अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sohail Khan Sells Mumbai Property for Crores of Rupees

Web Summary : Sohail Khan sold his Andheri West commercial office for ₹5.90 crore to Bilkish Associates. The 1,550 sq ft property includes parking. Previously, Arpita Khan sold an apartment, while Arbaz Khan bought one. Deal finalized March 27, 2026.
टॅग्स :बॉलिवूडसोहेल खानअर्पिता खानमुंबईसेलिब्रिटी