Join us

नक्की चाललंय काय? घटस्फोटानंतरही सोहेल आणि सीमा सजदेह एकत्र, लंडनमध्ये करताहेत व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:41 IST

काही दिवसांपूर्वीच सोहेल आणि त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह हिला एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. सध्या सोहेल त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि सीमा सजदेह घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. २४ वर्षांच्या सुखी संसारानंतर ते वेगळे झाले. मात्र, घटस्फोटानंतरही ते दोघेही आता लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यामुळे नक्की यांच्यात काय चाललंय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

काही दिवसांपूर्वीच सोहेल आणि त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह हिला एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. सध्या सोहेल त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोहेल त्याच्या दोन्ही लेकांना घेऊन लंडनवारी करत आहे. तिथे त्याच्यासोबत त्याची एक्स पत्नी सीमा सजदेहदेखील आहे. सोहेलने लंडन ट्रीपचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

सोहेलच्या या फॅमिली ट्रिपवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. पण, काहींनी घटस्फोटानंतरही सोहेल आणि सीमाला एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना पाहून ट्रोल केलं आहे. दरम्यान, सीमा आणि सोहेलने १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यांना योहान आणि निर्वान ही दोन मुले आहेत. लग्नानंतर २४ वर्षांनी सोहेल आणि सीमा यांचा संसार मोडला. सोहेलशी घटस्फोटानंतर सीमा विक्रम सिंगला डेट करत आहे. तर सोहेलच्याही डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 

टॅग्स :सोहेल खानसेलिब्रिटी