सोहा अली खान बनली लेखिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 16:00 IST
शर्मिला टागोर यांची मुलगी आणि सैफ अली खान याची बहिण सोहा अली खान सध्या कुठे बिझी आहे? कुठल्याशा चित्रपटाच्या ...
सोहा अली खान बनली लेखिका!
शर्मिला टागोर यांची मुलगी आणि सैफ अली खान याची बहिण सोहा अली खान सध्या कुठे बिझी आहे? कुठल्याशा चित्रपटाच्या शूटींगमध्ये? तर नाही. सोहा बिझी आहे ती लेखन करण्यात. होय, ऐकता ते खरे आहे. सोहा अली खान लवकरच अभिनेत्रीसोबतच लेखिका म्हणून ओळखली जाणार आहे. यावर्षी सोहाचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक पूर्णपणे सोहाच्या व्यक्तिगत आयुष्यावर आधारित असणार आहे. एक रॉयल प्रीन्सेस ते एक सेलिब्रिटी या प्रवासातील तिचे बरे-वाईट अनुभव, काही आठवणी असा सगळा मिर्च-मसाला या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल.‘पेग्विंन इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. ‘The Perils of Being Moderately Famous’ असे या पुस्तकाचे नाव आहे. आता सोहाच्या मनात अचानक लेखिका बनण्याचा विचार कसा आला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर पुढची बातमी तुम्हाला वाचलीच पाहिजे. ती म्हणते, मला पुस्तके वाचायला आवडतात. मी एका मिनिटात ५१० शब्द वाचू शकते. त्यामुळे माझ्यासाठी लिहिणे हे फार कठीण नसावे, होय ना? माझ्याकडेही अनेक कलाकारांप्रमाणे काही वेळ मोकळा असतो. काही तरी रचनात्मक लिहिण्यासाठी मी या वेळेचा सद्उपयोग करू शकते. शेवटी मी एक राजकुमारी आहे. मला पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरित करणाºया प्रत्येक व्यक्तिला मला एक डॉलर द्यायचा झाल्यास मी सहा डॉलर वाटले असते,असेही सोहाने सांगितले.ALSO READ: सोहाचे ‘पुढचे पाऊल’!सोहा अली खान आणि कुणाल खेमूने सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवसआता इतके वाचल्यानंतर सोहाचे पुस्तक वाचण्यास तुम्ही उत्सूक असाल. पण थांबा...सोहाचा हा इशारा तेवढा वाचून घ्या. ती म्हणते, माझ्या पुस्तकात मी करिनाच्या चकाकणाºया त्वचेमागचे रहस्य किंवा भाऊ सैफने त्याच्या अॅक्शन चित्रपटासाठी कशी तयारी केली होती, हे लिहिल असे तुम्हाला वाटत असेल तर मला भीती आहे की, तुम्ही एका चुकीच्या पुस्तकाची प्रतीक्षा करत आहात. हे पुस्तक केवळ माझ्याबद्दल आहे.