सोहा अली खान आणि कुणाल खेमूने सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 16:46 IST
कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या प्रेमकथेला आता बरीच वर्ष झाली आहेत. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते दोघे लग्नबंधनात ...
सोहा अली खान आणि कुणाल खेमूने सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस
कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या प्रेमकथेला आता बरीच वर्ष झाली आहेत. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या दोघांनी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील सोहा आणि कुणालचे अनेक मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या. या पार्टीला सोहाने एक पांढऱ्या रंगाचा लेगेंगा तर कुणालने कुर्ता घातला होता या कॉस्च्युमध्ये ते दोघे खूपच सुंदर दिसत होते. सोहा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे फोटो टाकले असून आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कुणालला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असे तिने म्हटले आहे.कुणाल आणि सोहा लग्न करण्याच्या कित्येक महिने आधीपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. इतर बॉलिवूड सेलिब्रेटीप्रमाणे त्यांनी कधीच आपले नाते मीडियापासून लपवले नाही.कुणालने सोहाला लग्नासाठी पॅरिसमध्ये प्रपोज केले होते. तिनेच हि खुशखबर ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून आपल्या फॅन्सना दिली होती.ढुंडते रेह जाओगे या चित्रपटाच्या सेटवर कुणाल आणि सोहा यांची ओळख झाली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीला आपण कपल होऊ शकतो असे त्या दोघांनादेखील वाटले नव्हते, असे त्यांनी अनेक मूलाखतींमध्ये सांगितले आहे.सोहा आणि कुणालने ढुंडते रेह जाओगे या चित्रपटानंतर 99 या चित्रपटात काम केले. सोहा अली खान आणि कुणाल खेमूचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.