Join us

​सोहा अली खान आणि कुणाल खेमुच्या घरी आली नन्ही परी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 11:29 IST

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. ही बातमी कुणाल खेमूनेच मीडियाला ...

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. ही बातमी कुणाल खेमूनेच मीडियाला दिली आहे. कुणालाने ट्वीटद्वारे त्याच्या फॅन्सना ही बातमी सांगितली आहे. कुणाल त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतो, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, नवरात्रीच्या पवित्र दिवसांत आमच्या घरात छोट्याशा परीचे आगमन झाले आहे. सोहा आणि आमच्या मुलीची दोघांचीही तब्येत चांगली आहे. तुम्ही सगळ्यांनी आजवर आम्हाला दिलेल्या आशीर्वादासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. सोहा आणि कुणाल खेमू यांनी जुलै २०१४ मध्ये पॅरिसला जाऊन साखरपुडा केला होता. कुणालने पॅरिसच्या रोमँटिक वातावरणात सोहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. याआधी ते दोघे अनेक महिने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहात होते. त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये लग्न केले.  सोहा गरोदर असल्याची गुड न्यूज कुणालने सोशल मीडियाद्वारेच सगळ्यांना सांगितली होती. त्याने त्यावेळी त्याच्या ट्वीटमध्ये  म्हटले होते की, मला आणि सोहाला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की आम्हाला लवकरच बाळ होणार आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असणार याची मला खात्री आहे.सोहाने काही दिवसांपूर्वी तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी सोहाने परिधान केलेल्या पिंक कलरच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोत ती बेबी बंप दाखवताना दिसत होती. सोहा करिना कपूरप्रमाणे प्रेग्नन्सी एन्जॉय करताना या फोटोत दिसली होती. सोहा अली खान अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे तर कुणाल अजय देवगनसोबत गोलमाल या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सोहा ही सैफ अली खानची लहान बहीण आहे. करिना आणि सैफच्या आय़ुष्यात डिसेंबर २०१६ मध्ये छोट्याशा राजकुमारचे आगमन झाले होते. सैफ आणि करिनाचा तैमुर सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच हिट आहे. आता तैमुरनंतर त्यांच्या घरात आणखी एक बाळ आलेले असल्याने पतौडी कुटुंबातील सगळेच प्रचंड खूश आहेत. Also Read : लेटेस्ट फोटोशूटमध्ये ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे गर्भवती सोहा अली खान, पहा फोटो !