पेंटींगचा लिलाव करून ‘सोना’ करणार समाजसेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 11:20 IST
सोनाक्षी सिन्हा अगोदरच समाजसेवा आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. ती सध्या ‘अकिरा’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग ...
पेंटींगचा लिलाव करून ‘सोना’ करणार समाजसेवा!
सोनाक्षी सिन्हा अगोदरच समाजसेवा आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. ती सध्या ‘अकिरा’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.तसेच मीत ब्रॉस यांच्यासोबत रॅपींग करण्यासाठी ती मदत करत आहे. सोनाक्षीने एक सुंदर पेंटिंग साकारले आहे. ती आता त्या पेंटिंगचा लिलाव करणार असून चॅरिटीसाठी हे करणार आहे. ती आता तिचा ‘दबंग’ कोस्टार सलमान खान प्रमाणे चॅरिटेबल फाऊंडेशन्सला काही मदत देऊ इच्छित आहे.सोना ही पाळीव प्राण्याची प्रेमी आहे. त्यामुळे ती ‘पेटा’ ला सहकार्य करते. प्राण्यांना दत्तक घेण्यात यावे म्हणून तिने सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करते.तसेच ती जॉन अब्राहम सोबत ‘फोर्स २’ , अक्षय कुमारसोबत ‘नमस्ते इंग्लंड’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘इत्तेफाक’ च्या रिमेकमध्ये बिझी असणार आहे.